सरन्यायाधीश गवई यांच्या अवमानाचा तळेगावात निषेध

सरन्यायाधीश गवई यांच्या अवमानाचा तळेगावात निषेध

Published on

तळेगाव स्टेशन, ता. ७ : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट भिरकावून एका वकिलाने त्यांचा अवमान केला. या घटनेचा तळेगाव दाभाडे येथील फुले- शाहू -आंबेडकर प्रतिष्ठानने निषेध केला आहे.
संबंधित वकिलावर कठोर कारवाईची मागणी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ‘‘हा अवमान केवळ गवई यांचा नसून, सर्वोच्च न्यायाधीशपदाचाही आहे,’’ असे प्रतिष्ठानतर्फे वडगाव मावळ तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड, माजी नगरसेवक अरुण माने आणि विजय गरुड यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com