गोल्डन रोटरी क्लबची 
तळेगावात रविवारी सायक्लोथॉन

गोल्डन रोटरी क्लबची तळेगावात रविवारी सायक्लोथॉन

Published on

तळेगाव स्टेशन, ता. १२ : पर्यावरण जनजागृतीहेतूने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, रोट्रॅक्ट क्लब आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या वतीने ‘गोल्डन रोटरी सायक्लोथॉन २०२६’ सायकल रॅलीचे येत्या रविवारी (ता. १५) सकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले आहे. मारुती मंदिर चौकात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री संजय भेगडे आदींच्या हस्ते या सायकल रॅलीचे उद्‍घाटन होणार आहे.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, नगराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल नितीन ढमाले, क्रिडा संचालक दीपक फल्ले आदी याप्रसंगी उपस्थित असतील. मारुती मंदिर चौक- गणपती चौक- शाळा चौक- जिजामाता चौक- स्टेशन चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- मराठा क्रांती चौक- इंद्रायणी महाविद्यालय- हिंदमाता भुयारी मार्ग- कडोलकर कॉलनी मार्गे पुन्हा मारुती मंदिर चौकात येऊन सायक्लोथॉनचा समारोप होणार आहे. याप्रसंगी पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी संबंधित सायकल सजावट स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असा चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास १६ दिवसांत पूर्ण करणारे सायकलपटू गणेश गायकवाड आणि सूरज जाट यांचा विशेष सन्मान याप्रसंगी केला जाणार आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com