‘लोहगडावरील बेकायदा प्रकार थांबवावेत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लोहगडावरील बेकायदा प्रकार थांबवावेत’
‘लोहगडावरील बेकायदा प्रकार थांबवावेत’

‘लोहगडावरील बेकायदा प्रकार थांबवावेत’

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता.२ : लोहगड किल्ल्यावरील बेकायदा प्रकार थांबवावेत व अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी मावळ तालुका बजरंग दलाने केली आहे. या संदर्भात बजरंग दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मावळ तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
लोहगडावर श्री शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाचा साक्षीदार असून सर्व शिव भक्तांचे शक्ती व स्फूर्तिस्थान आहे. या किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम निदर्शनास आले आहे. त्यामध्ये मजार व थडगी आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोहगडावरील अनधिकृत बांधकामे काढून टाकावीत, अशी मागणी बजरंग दल कार्यकर्ते महेंद्र असवले यांनी सांगितले. योगेश शेटे, मारुती देवकर, आकाश वारुळे, कैलास पडवळ, साई डांगले, विकी शेटे, शुभम दरेकर, प्रतीक गोसावी, विश्वास दळवी आदी उपस्थित होते.