Sun, Feb 5, 2023

जनसंपर्क अभियानाला वडगावमध्ये प्रतिसाद
जनसंपर्क अभियानाला वडगावमध्ये प्रतिसाद
Published on : 11 January 2023, 8:47 am
वडगाव मावळ, ता. ११ : वडगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १६ मधील मनसेच्या नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी नगरसेविका सायली म्हाळसकर यांच्या वतीने नागरिक संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान त्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांची विचारपूस करून त्याचे निरसन केले जात आहे. विकास कामांसाठी नागरिकांच्या सूचना व संकल्पना जाणून घेतल्या जात आहे. या अभियानात तानाजी तोडकर, विकास साबळे, दिनेश म्हाळसकर, प्रणव म्हाळसकर, आदित्य म्हाळसकर, विक्रम कदम, महेंद्र शिंदे, पौरस डुकरे, संतोष म्हाळसकर आदी सहभागी झाले आहेत.