Tue, Jan 31, 2023

सेवा रस्त्यावरील कामे
पूर्ण करण्याची मागणी
सेवा रस्त्यावरील कामे पूर्ण करण्याची मागणी
Published on : 11 January 2023, 8:49 am
वडगाव मावळ, ता. ११ : पुणे-मुंबई महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी वडगाव शहर भाजपने रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर आदींनी रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. वडगाव शहरामधील राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली असून त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन सेवा रस्त्याची अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करावीत व नागरिकांची गैरसोय दूर करावी.