Sun, Jan 29, 2023

राज्यस्तरीय काव्य संमेलनात
संजय जगताप यांची कविता सादर
राज्यस्तरीय काव्य संमेलनात संजय जगताप यांची कविता सादर
Published on : 24 January 2023, 10:14 am
वडगाव मावळ, ता. २४ : पाचगणी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मायमराठी काव्य संमेलनामध्ये मावळचे शिक्षक कवी संजय जगताप यांनी सहभाग घेऊन कवितांचे सादरीकरण केले. महाराष्ट्रातील प्रख्यात व रसिकप्रिय काव्यसमुह कविता-तुझी आणि माझी आयोजित पहिले राज्यस्तरीय मायमराठी काव्य संमेलन पाचगणी येथे २१ व २२ जानेवारी रोजी साहित्यिक कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, चित्रपट निर्मिती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, केशवराव घोळवे, पाचगणी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, आनंद पळसे, कवी उद्धव कानडे, प्रा. संजय पवार, प्रा. संपतराव गर्जे, हेमंत चांदगुडे, नारायण सुमंत, प्रकाश होळकर आदी उपस्थित होते. या संमेलनात मावळ तालुक्यातील शिक्षक कवी संजय जगताप यांनी कवितांचे सादरीकरण केले.