अखंड हरिनाम सप्ताहाची सातेमध्ये उत्साहात सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखंड हरिनाम सप्ताहाची
सातेमध्ये उत्साहात सांगता
अखंड हरिनाम सप्ताहाची सातेमध्ये उत्साहात सांगता

अखंड हरिनाम सप्ताहाची सातेमध्ये उत्साहात सांगता

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ३१ ः साते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा चतुर्थ तपपूर्ती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी व उत्साहात साजरा झाला.
साते येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ४८ वे वर्ष होते. यंदा २२ ते २९ जानेवारी दरम्यान साजऱ्या झालेल्या या सप्ताह काळात दररोज सकाळी काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन आणि रात्री पंचक्रोशीतील गावांचे भजन असा दिनक्रम होता. गावातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अनेक युवक व युवतीही ज्ञानेश्वरी पारायण करण्यास बसले होते. सप्ताहात गुरुवर्य वै. पांडुरंग महाराज वैद्य (बाबा) यांचे पादुका अनावरण गुरुवर्य मारोती कुरेकर महाराज यांच्या हस्ते झाले. नारायण महाराज काळे, केशव महाराज मुळीक, पुंडलिक महाराज मोरे, उत्तम महाराज बढे, पांडुरंग महाराज शितोळे, ज्ञानेश्वर महाराज सबलक, तुकाराम महाराज मुळीक यांची कीर्तने झाली. रथसप्तमीला श्री विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिवस दीपोत्सवाने साजरा झाला. अशोक महाराज पांचाळ यांच्या काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
फोटोः 05059