Thur, March 23, 2023

वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत
वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत
Published on : 10 February 2023, 2:42 am
वडगाव मावळ, ता. १० : वंदे भारत एक्स्प्रेसचे वडगाव रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. शुक्रवारपासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे कार्यकर्त्यांनी वडगाव स्थानकावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. वडगाव बार असोशियनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र गाडे, वडगाव भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे, काँग्रेसचे मावळ तालुका संपर्क प्रमुख राजू शिंदे, सिद्धार्थ झरेकर, सुनील म्हाळसकर आदी उपस्थित होते.