वडगावात आज वसुंधरा अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावात आज वसुंधरा अभियान
वडगावात आज वसुंधरा अभियान

वडगावात आज वसुंधरा अभियान

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १६ : वडगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत शुक्रवारी (ता. १७) नदी, नाले, तलाव स्वच्छता व श्रमदान मोहिमेचे आयोजन केल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी दिली.
वडगाव नगरपंचायतीच्या वतीने शहरात माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चला जाणूया नदीला हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नदी, नाले, तलाव स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजता या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. श्रमदानादरम्यान इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या खापरे ओढ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष ढोरे व मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी केले आहे.