जैन परंपरेची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम

जैन परंपरेची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम

Published on

वडगाव मावळ, ता. १० : येथील संत विचार अध्यासनाच्या वतीने जैन परंपरेची माहिती देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यासनाचे प्रमुख अजित देशपांडे यांनी दिली.
देशपांडे यांनी सांगितले की, कर्नाटकातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाली. त्याचे पडसाद उमटलेले दिसले नाहीत. त्याचा निषेधही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात व्यक्त झालेला दिसून आला नाही. त्या मागे जैनसंप्रदायाविषयी असलेल्या माहितीचा अभाव हे कारण असावे. संतावरील वारंवार घडणाऱ्या हल्यांच्या घटनांविषयी कोणालाच विशेष खेद वाटत नसल्याचे चित्र दिसून येते. भारतातील जैन परंपरा ही बौध्द परंपरे इतकीच पुरातन आहे. व्यापारी समाजाचा धर्म इतकीच माहिती सर्वसामान्य नागरिकांना असते. जैन समाजाचे ग्रंथ व वाड़मय हे बाहेर सहज उपलब्ध नसल्याने इतर समाजाला या पंथाविषयी विशेष माहिती नसते. भारतीय दर्शन शास्त्रामध्ये जैनदर्शन हे प्रमुख मानले आहे. परंतु ते नास्तिक मत म्हणून त्याचा विचार धर्माचार्य आपल्या प्रवचनातुन करीत नाहीत. त्यामुळे या परंपरेविषयी सहज माहिती कोठेच उपलब्ध होत नाही.
शालेय जीवनात असलेला एकमेव पाठ जैनाचे दोन पंथ आहेत व महावीर स्वामीचा फोटो इतकीच शिकवण देत असतो. आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक असलेल्या अहिंसाप्रिय समाजाविषयी प्रबोधनपर माहिती सर्वसामान्य जनतेला असावी या हेतूने जैन परंपरा, जैन आचारविचार, जैन तत्वे, व्रते, तीर्थकर, जैन लेणी, जैन शिलालेख, जैन स्थापत्य, जैन श्रमण परंपरा यांची पीपीटी, व्हीडीओ, लेख व पुस्तिका यांच्या माध्यमातून माहितीची मोहीम लवकरच सुरू करणार असल्याची माहिती येथे नव्याने स्थापन होत असलेल्या संत विचार अध्यासनाचे प्रमुख अजित देशपांडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.