मावळात आज प्रधानमंत्री 
किसान समृद्धी केंद्रांचे उद्‍घाटन

मावळात आज प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्‍घाटन

Published on

वडगाव मावळ, ता. २७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२७) देशभरातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्‍घाटन होणार आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील सुमारे पन्नास केंद्रांचा समावेश असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी दिली.

भेगडे यांनी सांगितले की, देशात दोन लाख आठ हजार, राज्यात चौदा हजार, पुणे जिल्ह्यामध्ये ६५० तर मावळ तालुक्यात जवळपास पन्नास प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे सुरू होणार आहेत. मावळ भाजपच्या वतीने इंदोरी, दारुंब्रे, टाकवे बुद्रूक, कामशेत व कडधे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकऱ्यांसह उपस्थित राहणार असल्याची माहिती भेगडे यांनी दिली.

यावेळी पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता वितरित करण्याचा प्रारंभ राजस्थान येथून होणार असून किसान समृद्धी केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. मावळ तालुक्यातील शासनमान्य विक्रेत्यांच्या दुकानांनाच प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या कृषी विषयक व शेतकरी हिताच्या योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाच्या विविध योजनेतील अनुदानावर उपलब्ध होणारी खते, बी,बियाणे, औषधे आणि कीटकनाशके या केंद्रावर अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. तसेच माती परीक्षण, शेतकऱ्यांना पीक पद्धती बद्दल मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षणासह शेती संबंधी नवीन तंत्रज्ञानाची माहिती या केंद्रावर शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी या केंद्रांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. कृषी विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहजरीत्या स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी यासाठी या प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचा मोठा उपयोग शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती भेगडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.