मावळात निवडणुकीची यंत्रणा सज्ज

मावळात निवडणुकीची यंत्रणा सज्ज

वडगाव मावळ, ता. ११ : लोकसभा निवडणुकीसाठी मावळ विधानसभा मतदारसंघात यंत्रणा सज्ज असून, रविवारी (ता. १२) सकाळपासून मतदान केंद्रांसाठी यंत्रांचे वाटप करण्यात येणार असून, तेथे कर्मचारी दाखल होतील, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

सर्व नगरपालिका, ग्रामपंचायत, सर्कल, तलाठी, कोतवाल पोलिस पाटील यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व मतदान केंद्रनिहाय पथकांवर ४५ सेक्टर अधिकाऱ्याद्वारे समन्वय व सनियंत्रण करण्यात येणार आहे. नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, या नियंत्रण कक्षात एकूण ४५ अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष सेक्टर अधिकारी त्यांच्या संपर्कात राहून प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील सूचना माहितीची देवाण-घेवाण करणार आहे. एक संगणकीय कक्ष संगणक प्रणालीमध्ये सेक्टर अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन संगणक प्रणालीत नोंदवणार आहे. प्रत्येक सेक्टर ऑफिसर यांच्याकडे एक राखीव मतदान यंत्र असणार आहे. एक ईव्हीएम पथक पर्यायी ईव्हीएम व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला आहे.

मावळ विधानसभा
- पुरुष ः १, ४२,३२८
- महिला ः १,३७,४६२
- तृतीयपंथी ः १३
- एकूण ः ३,७३,४०८
- मतदान केंद्रे ः ३९०

तयारी विशेष
- वडिवळे संवेदनशील मतदान केंद्र
- जांभूळ येथे एक महिला मतदान केंद्र
- वडगाव येथे एक युवा मतदान केंद्र
- लोणावळा येथील कॉन्व्हेंट स्कूलमधील एक आदर्श मतदान केंद्र
- सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध
- बीएलओ यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदार चिठ्ठ्यांचे वाटप
- प्रत्येक मतदान केंद्रावर एक असे एकूण ३९० बीएलओ यांची नियुक्ती
- एक सुरक्षा कर्मचारी प्रत्येक केंद्रनिहाय एक सुरक्षा कर्मचारी नियुक्त
- निवडणुकीसाठी एकूण ३९० पथके असून केंद्रांवरील एकूण एक हजार ८०६ राखीवसह कर्मचारी नियुक्त
- सर्व पथकांवर व केंद्रांवर समन्वय व सहनियंत्रणासाठी ४५ सेक्टर अधिकारी

असे असेल यंत्रणा
- रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळेगावातून ४५ टेबल व सेक्टर अधिकाऱ्याद्वारे तृतीय प्रशिक्षण व मतदान साहित्य वाटप करण्यात येणार
- निवडणूक साहित्याबरोबरच प्रत्येक केंद्रनिहाय प्राथमिक उपचार पेटी व ओआरएस पाकीट वाटप करणार
- आशा सेविकांचीदेखील मतदान केंद्रनिहाय नेमणूक
- आरोग्य यंत्रणेमार्फत प्रत्येक आरोग्य केंद्रात मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा कक्ष स्थापन करणार
- सर्व मतदान केंद्र पदके आपापल्या केंद्रांवर त्याच दिवशी बसद्वारे मतदान केंद्रांवर पोहोचणार
- मतदारसंघासाठी ८० बसची व्यवस्था
- सर्व बसेसला जीपीएस व पोलिस सुरक्षा देण्यात येणार
- मतदान केंद्रावर फर्निचर, पाणी व इतर सुविधा

मतदानाच्या दिवशी सकाळी सर्व मतदान केंद्रनिहाय मॉकपोल पार पाडून प्रत्यक्ष सात वाजता मतदानाला सुरुवात करण्यात येणार आहे व सायंकाळी सहापर्यंत मतदान सुरू राहणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर, पाणी, स्वच्छतागृह इत्यादी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत. दर दोन तासांनी मतदान केंद्राध्यक्ष सेक्टर अधिकाऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षाला मतदानाची आकडेवारी देणार आहे. मतदान केंद्राबाहेर १०० मीटर व २०० मीटर अशा हद्दी खुणा असणार आहेत. मतदानाच्या दिवशी सर्व आठवडे बाजार बंद राहणार आहेत. सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा.
- सुरेंद्र नवले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com