वादळी वाऱ्यासह वडगावात पावसाची हजेरी

वादळी वाऱ्यासह वडगावात पावसाची हजेरी

वडगाव मावळ, ता.१६ : वडगाव परिसरात गुरुवारी (ता.१६) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग्ज, विजेचे खांब, वीजवाहक तारा व झाडे पडली असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. घरांवरील पत्रेही उडाले असून येथील आठवडे बाजारातील विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.
वडगाव परिसरात गुरुवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. गाराही पडल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहर व परिसरातील अनेक भागांत झाडे, झाडाच्या फांद्या, विजेचे खांब व वीजवाहक तारा पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे, वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांची मोठी गैरसोय झाली. आठवडे बाजारातील विक्रेते व ग्राहकांची त्रेधातिरपीट उडाली. विक्रेत्यांनी उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी बांधलेले प्लास्टिक पेपर फाटले व उडून गेले. भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.

आणखी कुठे काय घडले...
- न्यू इंग्लिश स्कूलजवळील उच्चदाब वाहिनीची तार तुटून खाली पडली.
- येथील एका घराजवळील झाडही उन्मळून पडले.
- मयुरेश्वर कॉलनीमधील एका घरावरही झाड पडले.
- म्हाळसकरवाडी, ठाकरवस्ती येथील हाय मास्ट सोलर दिव्यांचे खांब वाकले.
- ब्राम्हणवाडी रस्त्यावरील विजेचे खांब पडून वीजवाहक तारा खाली पडल्या.
- साखळी रस्त्यावरील होर्डिंग्जही खाली कोसळले. वाहतूक ठप्प झाली.
- वाऱ्यामुळे आंबा पिकाचेही मोठे नुकसान, काढणीचे आंबे मोठ्या प्रमाणावर गळाले.
- काही घरांवरील पत्रेही उडाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com