रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना त्वरीत मोबदला द्या

रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना त्वरीत मोबदला द्या

Published on

वडगाव मावळ, ता.३ : ‘‘पुणे (पूर्व) वर्तुळाकार मार्गासाठी (रिंग रोड) जमिनी दिलेल्या वडगाव, कातवी व आंबी येथील शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळावा,’’ अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केली.
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, मुकेश शिंदे, नगरसेवक किरण म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, अमोल धिडे आदी पदाधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेतली. तसेच त्यासंदर्भातील निवेदन त्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पुणे (पूर्व) वर्तुळाकार रस्त्यासाठी(रिंग रोड) वडगाव, कातवी व आंबी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. जमिनीचे भूसंपादन होऊन सात बारा सदरी संपादनाची नोंदही झाली आहे. रिंगरोडमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी या कामासाठी सुरुवातीपासून सहकार्याची भूमिका घेतली आहे. असे असताना शासनाकडून मात्र शेतकऱ्यांची अडवणूक व पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांना अद्याप मोबदला व नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीन महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेलेला आहे. बाधित शेतकरी अजूनही नुकसान भरपाई रक्कम मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. वास्तविक, पाहता मावळ तालुक्यात वेगवेगळ्या प्रकल्पांकरिता भूसंपादन झाले आहे. परिस्थितीनुसार शेतकरी बांधवांनी आंदोलन व सहकार्य देखील केले आहे. हा इतिहास शासनास ज्ञात आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यांचा न्याय्य मोबदला मिळविण्यासाठी शासन दरबारी अनेक खेपा व हेलपाटे मारावे लागत आहेत. हा शेतकरी बांधवांवर घोर अन्याय आहे. शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.