शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

Published on

वडगाव मावळ, ता. ४ ः मावळ तालुक्यात आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद व खासगी शाळा मिळून २११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील १९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तर पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एक हजार चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील सोळा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

पिंपळोली शाळेची विद्यार्थिनी इशिता कुंडलिक शिंदे ही आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तेरावी तर तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेंट शाळेचा विद्यार्थी श्रीरुप जगताप हा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा आला आहे. अशी माहिती मावळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.
आठवी व पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यातील शाळांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. दोन्ही परीक्षेला मिळून तालुक्यातील चार हजार ६८५ विद्यार्थी बसले होते. त्यातील एक हजार २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यातील केवळ ३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हा परिषद शाळेचे ८६ विद्यार्थी बसले होते. त्यातील अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यातील दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. खासगी शाळांतील एक हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यातील नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हा परिषदेचे एक हजार ६०० विद्यार्थी बसले होते. त्यातील ५५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व केवळ पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. खासगी शाळांतील एक हजार ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यातील अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

मावळ तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल निराशाजनक आहे. मात्र, जिल्ह्याच्या मानाने आपल्या तालुक्याची कामगिरी चांगली आहे. आगामी काळात या परीक्षेसाठी जास्तीत जास्त ट्रेनर तयार करून ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- सुदाम वाळुंज, गट शिक्षणाधिकारी, मावळ पंचायत समिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.