मतदारसंघांमध्ये उलथापालथ; इच्छुकांची ‘धावाधाव’

मतदारसंघांमध्ये उलथापालथ; इच्छुकांची ‘धावाधाव’

Published on

वडगाव मावळ, ता. १५ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच मतदार संघांची (गट) व पंचायत समितीच्या दहा मतदार संघांची (गण) प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केली. या प्रारूप रचनेवर २१ तारखेपर्यंत हरकती नोंदवता येतील. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणांची संख्या पूर्ववत झाल्याने तसेच नगरपंचायत झाल्याने मोठ्या लोकसंख्येचे वडगाव शहर यातून बाहेर पडल्याने पूर्वीच्या गट व गणांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मोर्चेबांधणी केलेल्या इच्छुकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती दिसून येत आहे.

मावळ तालुक्यात पूर्वी जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण होते. ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढविण्यात आले होते. आता नव्याने जाहीर झालेल्या फेररचनेत तालुक्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या व पंचायत समिती गणांची संख्या पूर्ववत करण्यात आली आहे. २०११ च्या जन गणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या दोन लाख ४८ हजार २८५ एवढी धरून ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. नागरिकांच्या माहितीसाठी ही प्रभाग रचना मावळ तहसील कार्यालयात लावण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख व नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिली.

इच्छुकांमध्ये उत्सुकता
ग्रामीण भागातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. सर्वच पक्षातील इच्छुकांनी गेल्या तीन वर्षांपासून त्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यातील अनेक इच्छुकांनी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी गेल्या लाखो रुपये खर्चून विविध उपक्रम व कार्यक्रम राबवले आहेत. त्या सर्वांचे लक्ष प्रभाग रचना जाहीर होण्याकडे लागले होते. अखेर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची संख्या पूर्ववत झाल्याने तसेच वडगाव शहर नगरपंचायत झाल्याने बाहेर पडल्याने पूर्वीच्या गटांची व गणांची नावे बदलली आहेत. समाविष्ट गावांमध्येही मोठे फेरबदल झाले आहेत. हे बदल काही जणांच्या फायद्याचे तर काही जणांच्या तोट्याचे झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांची ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती झाली आहे. आरक्षण सोडतीनंतर त्यात आणखी भर पडणार आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषदेचे नव्याने झालेले गट व पंचायत समिती गण व त्यातील समाविष्ट गावे व वाड्या वस्त्या पुढीलप्रमाणे-
१) टाकवे बुद्रुक- वडेश्वर गट (क्र. २९)
- टाकवे बुद्रुक पंचायत गण (क्र. ५७) : सावळे, माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, पिंपरी अमा, इंगळूण, कुणे अनसुटे, कशाळ, किवळे, भोयरे, कोंडिवडे अमा, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, घोणशेत, वाऊंड, कचरेवाडी, साई, पारवडी, नाणोली नामा, टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज, आंबळे, शिरे, मंगरूळ.
- वडेश्वर पंचायत समिती गण (५८) : खांड, कुसूर, डाहुली, वहाणगाव, कांब्रे अमा, बोरवली, कुसवली, नागाथली, वडेश्वर, माऊ, शिरदे, सोमवडी, थोराण, राकसवाडी, जांभवली, खांडशी, नेसावे, सांगिसे, वेल्हवळी, बुधवडी, मुंढावरे, वडिवळे, वळख, गोवित्री, भाजगाव, वळवंती, वडवली, उकसाण, करंजगाव, ब्राम्हणवाडी, पाले नामा, मोरमारवाडी, कांब्रे नामा, कोंडिवडे नामा, नाणे.

२) वराळे-इंदोरी गट (क्र. ३०)
- वराळे पंचायत समिती गण (क्र. ५९) : नवलाख उंब्रे, जाधववाडी, बधलवाडी, मिंडेवाडी, आंबी, राजपुरी, आकुर्डी, वराळे, जांभूळ, सांगवी, साते, ब्राम्हणवाडी, मोहितेवाडी.
- इंदोरी पंचायत समिती गण (६०) : जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, माळवाडी, तळेगाव ग्रामीण, नाणोली तर्फे चाकण.

३) खडकाळे- कार्ला गट (३१)

- खडकाळे पंचायत समिती गण (६१) : कान्हे, नायगाव, चिखलसे, अहिरवडे, कुसगाव खुर्द, खडकाळे, खामशेत, ताजे, पिंपळोली, पाथरगाव.
- कार्ला पंचायत समिती गण (६२) : टाकवे खुर्द, शिलाटणे, पाटण, बोरज, मळवली, सदापूर, कार्ला, वेहेरगाव, दहिवली, वाकसई, देवघर, करंडोली, डोंगरगाव, वरसोली, पांगळोली, उधेवाडी, कुणे नामा.
४) कुसगाव बुद्रुक- काले गट (३२)
- कुसगाव बुद्रुक पंचायत समिती गण (६३) : कुरवंडे, कुसगाव बुद्रुक, औंढे खुर्द, औंढोली, देवले, भाजे.
- काले पंचायत समिती गण (६४) : लोहगड, आपटी, गेव्हंडे आपटी, दुधिवरे, आतवण, मोरवे, शेवती, कोळे चाफेसर, आंबेगाव, माजगाव, शिंदगाव, पानसोली, पाले नामा, तुंग, केवरे, चावसर, शिळींब, वाघेश्वर, कादव, अजिवली, जवण, ठाकूरसाई, गेव्हंडे खडक, तिकोना, मळवंडी ठुले, कोथुर्णे, वारू, ब्राम्हणोली, काले, महागाव, धालेवाडी, मालेवाडी, सावंतवाडी, प्रभाचीवाडी, येळसे, कडधे, करूंज, बेडसे, थुगाव, आर्डव, शिवली, भडवली.
५) सोमाटणे-चांदखेड गट (३३)
- सोमाटणे पंचायत समिती गण (६५) : बऊर, ब्राम्हणवाडी, मळवंडी पमा, शिवणे, सडवली, ओझर्डे, आढे, उर्से, परंदवडी, सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे.
- चांदखेड पंचायत समिती गण (६६) : दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, चांदखेड, धामणे, बेबडओहळ, पिंपळखुटे, आढले खुर्द, आढले बुद्रुक, डोणे, येळघोळ, धनगव्हाण, दिवड, ओवळे, पुसाणे, पाचाणे, कुसगाव पमा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com