अमली पदार्थ विरोधी वडगावमध्ये जनजागृती रॅली
वडगाव मावळ, ता. १६ : रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वडगाव मावळ पोलिस स्टेशन व वडगाव नगरपंचायतीच्या वतीने शहरातून अमली पदार्थ विरोधी व तंबाखू मुक्त शाळा जनजागृती रॅली काढण्यात आली.
शाळेपासून काढण्यात आलेल्या रॅलीत पोलिस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, प्राचार्य सतीश हाके, माजी विद्यार्थी संभाजी म्हाळसकर, देवस्थानचे सचिव अनंता कुडे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, किरण म्हाळसकर आदी सहभागी झाले होते. तत्पूर्वी शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी अमली पदार्थ व तरुण पिढी त्याच्या आहारी कशी जात आहे? याचे उदाहरणे सांगितली. स्वच्छता, अमली पदार्थ यांविषयी समाजात, परिसरात जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी कोणती भूमिका पार पाडू शकतात, याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येकाने शपथ घेऊन हा लढा द्यायचा आहे. यासाठी आपण जागृत होणे गरजेचे आहे. प्राचार्य सतीश हाके यांनी स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले. पोटोबा देवस्थानचे सचिव अनंता कुडे यांनी स्वच्छता व अमली पदार्थ शरीराला हानिकारक कसे आहे हे सांगितले. त्यानंतर जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. घोषणा देत हातात स्वच्छता जागृती, अमली पदार्थ विरोधी जनजागृती फ्लेक्स धरून विद्यार्थी सहभागी झाले होते. मातोश्री हॉस्पिटल, पोटोबा देवस्थान, पोलिस ठाणे मार्गे रॅली काढण्यात आली. पोलिस ठाण्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. रॅलीमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी ठिकठिकाणी स्वच्छतेवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण केले. प्राचार्य सतीश हाके यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका जे. ए. बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.