वडगाव नगरपंचायतीतर्फे पर्यावरणपूरक मंडळ स्पर्धा
वडगाव मावळ, ता. २६ : वडगाव नगरपंचायतीने पर्यावरणपूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली आहे. अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले.
त्यांनी सांगितले की, वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, तापमानवाढ आदी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने नगरपंचायतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मंडळांना विविध निकषांच्या पुर्ततेनुसार गुण दिले जातील. कमाल एकूण शंभर गुण असतील. प्रथम तीन क्रमांकांच्या मंडळांना आकर्षक बक्षीसे दिली जातील.
मंडळांसाठी स्पर्धेचे निकष ः
- नगरपंचायतीची परवानगी
महावितरणचे ना हरकत प्रमाणपत्र
- स्थानिक पोलिस ठाण्याची परवानगी
- गणेश मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक
- सजावटीसाठी कोणत्याही प्रकारच्या अविघटनशिल घटकांचा वापर नसावा (उदा. प्लास्टिक, थर्माकोल आदी)
- निर्माल्य व घनकचऱ्याचे व्यवस्थापन
- मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्यांचा वापर
- ध्वनी प्रदूषण व पर्यावरण प्रदूषण टाळावे
- मंडळाच्या जागेत अग्निरोधक उपकरणे ठेवावीत
- विसर्जनाच्या दिवशी नगरपंचायतीच्या गणेशमूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान करावी
- मनोरंजनपर कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरांचे आयोजन (उदा. रक्तदान शिबिर)
- साथीच्या रोगांविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना
- स्वच्छतेबाबत जनजागृती
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.