स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा 
वडगावमध्ये सन्मान

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा वडगावमध्ये सन्मान

Published on

वडगाव मावळ, ता. ६ : मावळ तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन वर्षात विविध स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा झाला.
मावळातील अनेक विद्यार्थी गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवेत रुजू झाले आहेत. मावळ तालुका मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा वडगाव येथे आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक अडचणींवर कशा प्रकारे मात करत यश प्राप्त केले त्यांचे अनुभव कथन केले. धडपडीचा पाढा त्यांनी वाचला. काही विद्यार्थ्यांनी सांगितले, मावळ तालुक्यात एक मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे जेणेकरून, गरीब विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. मावळ तालुक्यात मराठा समाजाचे भवन उभारावे, असे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी पोलिस भरती, महसूल विभाग, सीए परीक्षा, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग, सहकार विभाग अशा अनेक विभागात रुजू झाले आहे. यामध्ये अक्षदा लांडगे (एमपीएससी उत्तीर्ण), हर्षदा दळवी (तलाठी, जळगाव), अवंती मोहिते (पोलिस लोणावळा), श्रुती मालपोटे (पोलिस निरीक्षक कल्याण), महेश असवले (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल दिल्ली), शुभांगी जाधव (आर्मी सेवेत उत्तराखंड), चेतन केदारी(ग्रामविकास अधिकारी, रत्नागिरी), रवी केदारी (राज्य उत्पादक शुल्क, वसई), राजू असवले(महसूल सहाय्यक संचालनालय, येरवडा), संतोष ठाकर (पोलिस मुंबई), अक्षय पिंपळे (रेल्वे पोलिस मुंबई), गुरुदेव गरुड (सीए), सद्‍गुरु आगळमे (पिंपरी-चिंचवड पोलिस), वैभव आंबेकर (पिंपरी-चिंचवड पोलिस), प्रसाद इंगुळकर (तलाठी), रामकृष्ण तिकोने(नोंदणी व मुद्रांक विभाग), विशाल हरिहर (वनविभाग), अर्चना जाधव (सहाय्यक निबंधक), पंकज पिंपरे (सीए), शुभदा वरघडे (वनविभाग), प्रियांका जाधव (मुंबई पोलिस), निशा लालगुडे(पुणे पोलिस), ओंकार निंबळे(मुंबई पोलिस), अभिषेक काजळे (मुंबई पोलिस), सानिका काजळे (मुंबई पोलिस), स्नेहल दाभाडे (महसूल सहाय्यक), वैष्णवी यादव (मुंबई पोलिस), ओमकार भुडे (मुंबई पोलिस), नागेश मोहिते (मुंबई पोलिस), प्रतीक गायकवाड (पोलिस), अजिंक्य सावंत (तहसीलदार), ज्ञानेश्वर गोपाळे (सीए), नीलेश खेडेकर (उपजिल्हाधिकारी), दत्ता शेडगेरा (महसूल सहायक), अर्चना दहिभाते (सहकार निबंधक पुणे), वेदांगी आसवले(सीए), नीलेश कोकरे (पोलिस), सागर तळपे (राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक), करिना मोरे (पोलिस) यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com