न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
वडगाव मावळ, ता.१२ : राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय, पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, इंद्रायणी महाविद्यालय व मावळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक क्रीडा शिक्षक महामंडळाच्या वतीने शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
प्रतीश चव्हाण या विद्यार्थ्याने एक हजार ५०० मी. धावणे स्पर्धेत प्रथम आणि तीन हजार मी. धावणे स्पर्धेत द्वितीय, आर्यन मगर याने बांबू उडी स्पर्धेत प्रथम आणि चार हजार मी. धावणे स्पर्धेत द्वितीय, अर्चित हिले या विद्यार्थिनीने तीन हजार मी. धावणे स्पर्धेत प्रथम तर सृष्टी कार्ले या विद्यार्थिनीने गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या सर्वांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके, पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक गणेश शेंडगे, प्रवीण ढवळे, महादेव सुरवसे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.