वडगावमध्ये महिला मतदारांची टक्केवारी प्रथमच जास्त
वडगाव मावळ, ता. ३ : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी महिलांनी जास्त संख्येने मतदान केले. महिलांची टक्केवारी ७४.८५, तर पुरुषांची टक्केवारी ७१.८९ इतकी आहे. वडगावमध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी कायम जास्त असायची. यावेळी हे चित्र बदलले.
वडगावमध्ये एकूण ७३.३३ टक्के मतदान झाले. १० हजार १८४ पुरुष मतदारांपैकी ७ हजार ३२१ जणांनी मतदान केले. ९ हजार ६६३ महिला मतदारांपैकी ७ हजार २३२ जणींनी मतदान केले. एकूण १९ हजार ८४७ पैकी १४ हजार ५५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १७ पैकी १३ प्रभागांमध्ये महिला मतदारांची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त होती. त्यात १, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, १३, १५ आणि १६ या प्रभागांचा समावेश आहे.
महिला उमेदवारांचा प्रभाव
वडगावचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. या पदासाठी चार महिला रिंगणात होत्या. नगरसेवकपदाच्या १७ पैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. या जागांसाठी २० महिला रिंगणात होत्या. त्यामुळे महिला मतदारांचा टक्का जास्त राहिला. दोन्ही बाजूच्या प्रचारातही महिलांचा सहभाग लक्षणीय होता. निवडणुकीत चुरस असल्याने सर्वच प्रभागांतील उमेदवारांच्या कुटुंबांतील महिलांनी निवडणूक प्रक्रियेत हिरिरीने भाग घेतला. त्याचे प्रतिबिंब मतदानातही उमटले.
प्रभागनिहाय मतदान
क्रमांक ः पुरुष ः महिला ः एकूण ः टक्केवारी
१ : ४४० ः ४५१ ः ८९१ ः ६८.३८
२ : ५५७ ः ५६२ ः १,११९ः ८३.२६
३ : ३९६ ः ४०२ ः ७९८ ः ७१.३८
४ : ३१२ ः ३३७ ः ६४९ ः ७३.४२
५ : ४१४ ः ४३० ः ८४४ ः ७३.३९
६ : ४४६ ः ४३३ ः ८७९ ः ७२.७६
७ : ४६५ ः ४५२ ः ९१७ ः ६४.७६
८ : ३४२ ः ३१८ ः ६६० ः ७६.२१
९ : ४०५ ः ४०० ः ८०५ ः ७२.८५
१० : ३७० ः ३३७ ः ७०७ ः ७२.९६
११ : ३९७ ः ४०३ ः ८०० ः ७३.६६
१२ : २७५ ः २५२ ः ५६७ ः ७६.३१
१३ : ४९९ ः ५०३ ः १००२ ः ७७.४९
१४ : २४६ ः २६० ः ५०६ ः ६९.४१
१५ : ५०० ः ४७० ः ९७० ः ७३.२१
१६ : ४६५ ः ४७८ ः ९४३ ः ७३.२१
१७ : ७९२ ः ७०५ ः १,४९७ ः ७४.११
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

