जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष
वडगाव मावळ, ता. १२ : मावळ तालुक्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत, अंतिम मतदार याद्या अशी प्राथमिक सर्व तयारी पूर्ण झाल्याने इच्छुकांचे डोळे निवडणुकीच्या तारखेकडे लागले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने तत्पूर्वीच प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडत, जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण, अंतिम मतदार याद्या अशी प्राथमिक सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्र आणि जिल्हा परिषद गटनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या अंतिम मतदार याद्या राजकीय पक्ष, त्यांचे प्रतिनिधी किंवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
इच्छुकांचे लक्ष तारखेकडे
राज्य निवडणूक आयोग पन्नास टक्क्याच्या आत जिथे आरक्षण आहे, त्या राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये लवकरच निवडणूक घेण्याची शक्यता आहे. त्यात पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या व विविध उपक्रमांवर लाखो रुपये खर्च केलेल्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, त्यांचे डोळे निवडणुकीच्या तारखेकडे लागले आहे.
मावळात दोन लाख मतदार
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट (मतदार संघ) व पंचायत समितीचे दहा गण (मतदार संघ) आहेत. सर्व गटांची मिळून एकूण दोन लाख ३१६ मतदार संख्या असून त्यात एक लाख दोन हजार ८२ पुरुष, ९८ हजार २२६ महिला व आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. सर्वात जास्त ४५ हजार ७७५ मतदार सोमाटणे-चांदखेड जिल्हा परिषद गटात असून, सर्वात कमी ३६ हजार २८० मतदार इंदोरी-वराळे गटात आहेत. पंचायत समिती गणांमध्ये सर्वात जास्त २४ हजार १९९ मतदार काले गणात असून, सर्वात कमी १५ हजार ४१२ मतदार कुसगाव बुद्रुक गणात आहेत.
जिल्हा परिषद गट व मतदार संख्या
गट ः पुरुष ः महिला ः इतर ः एकूण
टाकवे बुद्रुक-नाणे : २०३१४ ः १९२३३ ः ० ः ३९५७०
इंदोरी-वराळे : १८५५२ ः १७७२६ ः २ ः ३६२८०
खडकाळा-कार्ला : १९८३० ः १९२७२ ः १ ः ३९१०३.
कुसगाव बुद्रुक-काले : १९९४९ ः १९६६० ः २ ः ३९६११
सोमाटणे-चांदखेड ः २३४३७, २२३३५ ः ३ ः ४५७७५
पंचायत समिती गण व मतदार संख्या
- टाकवे बुद्रुक : १०२०२ ः ९६३७ ः ० ः १९८३९
- नाणे : १०११२ ः ९५९६ ः ० ः १९७०८
- वराळे : १०१६९ ः ९६११ ः १ ः १९७८१
- इंदोरी : ८३८३ ः ८११५ ः १ ः १६४९९
- खडकाळे : १०३५७ ः १००७१ ः १ ः २०४२९
- कार्ला : ९४७३ ः ९२०१ ः ० ः १८६७४
- कुसगाव बुद्रुक : ७८००, ७६११, १, ः १५४१२
- काले : १२१४९ ः १२०४९ ः १ ः २४१९९
- सोमाटणे : ११८६२ ः १०९४७ ः २ ः २२८११
- चांदखेड : ११५७५ ः ११३८८ ः १ ः २२९६४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

