तिकोनावरील वास्तूंची रेखाटली रेखाचित्रे
वडगाव मावळ, ता. १२ : तिकोना (वितंडगड) गडावरील सर्व दरवाजे, लेणी व चुण्याचा घाणा यांचे आरेखन इतिहास अभ्यासक डॉ. सचिन जोशी व संदीप परांजपे यांच्याकडून नुकतेच करण्यात आले. या आरेखनाचा गड संवर्धनासाठी फायदा होणार आहे.
आरेखन मोहिमेमध्ये डॉ. जोशी व परांजपे यांनी गडावरील सर्व दरवाजे, लेणी, चुन्याचा घाणा यांची मोजमापे घेऊन आरेखन केल्यामुळे दरवाजांचे अचूक रेखाचित्र प्राप्त झाले आहेत. यामुळे भविष्यात गडावरील दरवाजे, चुन्याचा घाणा संवर्धनात याची मोठी मदत होणार आहे. तसेच लेणीचेही संपूर्ण मोजमाप घेतल्याने लेणीची रचना समजण्यास मदत होणार आहे. विविध गडावर दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था किंवा वैयक्तिक कामे करणाऱ्या व्यक्ती यांनी याप्रमाणे गडावरील ऐतिहासिक वास्तू, लेणी यांची रेखाटने तयार केल्यास त्याचा गडसंवर्धनात फायदा होईल तसेच हे काम दुर्गसंवर्धनाचाच भाग आहे, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

