वडगावमध्ये ठाकर कुटुंबियांना जातीच्या दाखल्यांचे वाटप
वडगाव मावळ, ता. १३ : वडगावमधील ठाकर समाजातील तेरा कुटुंबियांना नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया प्रतिष्ठानच्या सहकार्याने हे दाखले वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष अबोली ढोरे यांच्यासह नगरसेवक अजय भवार, गौतम सोनवणे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा ढोरे यांनी सांगितले की, वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी, कातकरी समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत. शैक्षणिक कामांसाठी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतु, अनेक कुटुंबांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना दाखले मिळत नाहीत. आमदार शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या सहकार्याने या बांधवांना दाखले मिळाले असून, अजूनही काही दाखल्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे. आगामी काळात केंद्र व राज्य शासनाच्या विविध हितकारक योजना तसेच महिला समाजकल्याण विभाग माध्यमातून महिला बचत गट स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
---

