

वडगाव मावळ, ता. १३ : जमीन हक्क परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुभाष धामणकर यांची नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माउली सोनवणे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. तालुकाध्यक्ष दिनकर शेटे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, जिल्हा संघटक सुनील गुजर, महिला अध्यक्षा करुणा सरोदे, तानाजी पडवळ, राहुल सावंत, अशोक जाधव आदी उपस्थित होते. धामणकर हे मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजप किसान मोर्चा, भूमाता शेतकरी कृती समिती आदी संस्थांवर कार्यरत आहेत.
---