

वडगाव मावळ, ता. १५ : वडगाव शहराचा अंतर्भाव शहरी भागात होत असल्याने येथील गॅस ग्राहकांना २५ दिवसांत गॅस सिलिंडर देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक अजय भवार यांनी तहसीलदारांकडे केली आहे. भवार यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, वडगावातील ग्राहकांना गॅस बुकिंग कालावधी २५ दिवसांचा करावा व त्यांना या कालावधीतच गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा.