उत्तर भारतीय बांधव व स्थलांतरित कामगारांचा होळी उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर भारतीय बांधव व स्थलांतरित कामगारांचा  होळी उत्सव
उत्तर भारतीय बांधव व स्थलांतरित कामगारांचा होळी उत्सव

उत्तर भारतीय बांधव व स्थलांतरित कामगारांचा होळी उत्सव

sakal_logo
By

वाकड, ता. १० : थेरगाव येथील श्री फाउंडेशनच्या वतीने उत्तर भारतीय परिवार आणि स्थलांतरित कामगारांसमवेत होळी उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवास थेरगाव, वाकड, काळेवाडीसह इतर भागातील नागरिक उपस्थित होते. उद्योजक दीपक शुक्ला व पदमजी पेपर प्रॉडक्ट कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष कालिदास वाडघरे यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. संगीतकार अशोक जाधव यांनी होळीचे गाणे गाऊन सर्वांचे मनोरंजन केले. उपस्थितांनी नाश्ता, थंडाई, मिठाईचा आनंदही लुटला. माजी नगरसेविका झामाबाई बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशांत पांडे, संदीप शिंदे, किरण साठे, प्रशांत जाधव, रोहित शुक्ला, लंलन शुक्ला, गोविंद दुबे, पवन तिवारी आदी मान्यवर उपस्थितीत होते. उत्तर भारतीय बांधवांच्या वतीने मान्यवरांचा तसेच पदमजी पेपर प्रॉडक्ट कर्मचारी पतसंस्थेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान झाला. कार्यक्रम यशस्वितेसाठी तुलसी मानस मंडल, रामचरित्र मानस मंडल, विशाल मित्र मंडल, गणेश भाऊ व सदाशिव कॉलनी मित्र परिवार इत्यादी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुशांत पांडे यांनी आभार मानले.