महापुरुषांच्या पुस्तकाचे संचचे वाटप

महापुरुषांच्या पुस्तकाचे संचचे वाटप

वाकड : महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हुतात्मा व महापुरुष यांचे स्मरण राहावे म्हणून चिंचवड येथील क्रांतिवीर चाफेकर गुरुकुल अनाथ आश्रमातील व गणेशनगर थेरगाव येथील खिंवसरा पाटील विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांसाठी गिरीश प्रभुणे, मुख्याध्यापक नटराज जगताप व शिक्षकांकडे महापुरुषांच्या पुस्तकाचे संच सुपूर्त करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना राज्याचे सरचिटणीस विद्यानंद मानकर विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, शहराध्यक्ष महाराष्ट्र अनिकेत प्रभू, ओंकार पाटोळे, सिद्धेश सोनकवडे, उपशहर अध्यक्ष किरण पाटील, प्रज्योत पुजारी, आकाश फंड, राहुल सरवदे, अनिल घोडेकर, यश कुदळे, गणेश डांगे आदी उपस्थित होते.

हजार गरजूंना अन्न-धान्य वाटप
वाकड : लोकनेते अशोक वाघमारे सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामगारांच्या कल्याणार्थ कामाच्या बारा तासाचे आठ तास करणारे कामगारांचे खरे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना अभिवादन करण्यासाठी कामगार दिनानिमित्त वाकड येथील गरीब-गरजू वीटभट्टी कामगार, मजूर, बांधकाम कामगार अशा तब्बल एक हजार कामगार कुटुंबीयांना भीम आर्मीचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष तुषार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्न-धान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष विजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विशाल वाघमारे, सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रूपेश शिंदे, उपाध्यक्ष किशोर साळवे, गौरव गवळी, सतीश दुधवडे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी विशाल वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com