
वेदांत साधना संस्थेचा संस्कारक्षम उपक्रम आमदार अश्र्विनी जगताप यांचे प्रतिपादन
हिंजवडी, ता. ५ : नव्या पिढीला संस्कारांची मोठी गरज आहे. संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुरू केलेले गुरुकुल संस्कार शिबिर नक्कीच लाभदायक आणि आशादायी ठरणार आहे. त्यामुळे रिहे येथील वेदांत साधना गुरुकुल संस्थेने सुरू केलेले हे संस्कार शिबिर बालकांसाठी वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार अश्विनी जगताप यांनी केले.
हिंजवडी शेजारील रिहे (ता. मुळशी) येथील बोरकर मळ्यातील वेदांत साधना वारकरी गुरुकुलमध्ये आयोजित केलेल्या ‘धी शुद्धीकरण’ निवासी बाल संस्कार शिबिराची पाद्य पूजन सोहळ्याने सांगता झाली. यावेळी जगताप बोलत होत्या. हे शिबिर तब्बल २१ दिवस चालले. यामध्ये आध्यात्मिक ज्ञानासोबत बालसंस्कार व योगा प्राणायाम व अंगमेहनतीचे खेळ तसेच प्रात्यक्षिक करण्याची संधी मुलांना मिळाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, तात्याबामहाराज बोरकर, विजय जगताप, राजेंद्र बांदल, रविकांत धुमाळ, प्रकाश भेगडे, आबा शेळके, बाबाजी शेळके, राजाभाऊ वाघ, तात्या देवकर, रामभाऊ सातपुते, माऊली साठे, धारूमामा बालवडकर, बाळासाहेब घावरे, दीपाली पडळघरे, शेखर महाराज जांभूळकर आदी उपस्थित होते.
शिबिराचा सांगता समारोह आई-वडिलांचे पाद्यपूजन आणि गुरुपूजन सोहळ्याने झाला. यात सुमारे ९० पालकांनी सहभाग घेतला होता.
03965