मारुंजीतील विद्यार्थ्यांना 
प्रवेशोत्सवाची अनोखी भेट

मारुंजीतील विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाची अनोखी भेट

हिंजवडी, ता. १८ : शाळेच्या पहिल्या दिवशी नवांगतांचे व अन्य विद्यार्थ्यांचे शाळांत मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. गुलाब पुष्प, चॉकलेट, फुगे, शालेय साहित्य भेट देण्यात आली. मात्र, आयटी नजीकच्या मारुंजी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क नवीन आठ वर्ग खोल्यांची अनोखी भेट देऊन प्रवेशोत्सव साजरा झाला.

मारूंजी ग्रामपंचायत निधीतून चार वर्ग खोल्यांच्या कामाला मान्यता मिळाल्याने आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. तद्नंतर सरपंच व ग्रामपंचायत कमिटीचा प्रयत्न व पाठपुराव्यातून
आयटी पार्क हिंजवडीतील एम्बेसी कंपनीने केलेल्या मदतीच्या आधारे शाळेसाठी पहिल्या मजल्यावरील चार वर्ग खोल्या उभारण्यात आल्या. या इमारतीचे शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्या विद्यार्थिनी व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी विद्यार्थ्यांना तीनशे हेल्थ किटचे वाटपही करण्यात आले.
यावेळी एम्बेसीचे सीईओ प्रसाद लाला, गट विकास अधिकारी संजय धमाळ, गट शिक्षण अधिकारी के. डी. भुजबळ, मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे-पाटील, माणिक बांगर, केंद्र प्रमुख सुरेश साबळे, सरपंच ईश्वर बुचडे, माजी सरपंच आकाश बुचडे, हिरामण बुचडे, देविदास बुचडे, संदीप बुचडे, तानाजी वाघमारे, नंदा बुचडे, जयश्री कवडे, प्रणोती कांबळे, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर, सोमा खैरे आदी उपस्थित होते. सर्व शिक्षक वृंदानी संयोजन केले. मुख्याध्यापिका वैशाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

या सरपंचांचे योगदान
तत्कालीन सरपंच कृष्णा बुचडे यांच्या काळात कामाचे भूमीपूजन झाले. आकाश बुचडे सरपंच असताना त्यांनी एम्बेसी कंपनीकडून सीएसआर फंड मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करत इमारतीचे काम पूर्ण केले. विद्यमान सरपंच ईश्वर बुचडे पदावर असताना इमारतीचे लोकार्पण झाले. दर्जा व गुणवत्तेला प्राधान्य देत बांधलेल्या या इमारतीत प्रशस्त व आधुनिक वर्ग खोल्या आहेत. पिण्याचे पाणी, शौचालय आदींची उत्तम सोय आहे. पायल अवचरमल, तनुष्का माने, ननया कुंभार, देवयानी चव्हाण, श्रावणी चव्हाण, सानिका कुंभार, आकांक्षा पाटील आदी विद्यार्थिनींच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com