आयटीत काळोख -जोड

आयटीत काळोख -जोड

ऑनलाइन कॉलला अडथळा
वीजपुरवठा खंडित झाल्यास इंटरनेट सेवेतही खंड पडतो. त्यामुळे आयटीयन्सची ऑनलाइन कॉल कट होतात. अनेकदा हे कॉल परदेशातून सुरू असतात. परदेशातील एखाद्या मोठ्या क्लाइंटच्या सॉफ्टवेअर व अन्य प्रॉडक्ट्सबाबत महत्त्वपूर्ण बोलणे सुरू असताना अचानक इंटरनेटसेवा बंद होताच कॉल कट होतो. त्यामुळे आयटीयन्सना मनस्ताप सहन करावा लागतो.


‘‘आमचा दूध डेअरी आणि स्वीट होमचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय संपूर्णपणे विजेवर अवलंबून आहे. रेफ्रिजरेटर, डीप फ्रिज आदी मोठी उपकरणे विजेअभावी बंद पडतात. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
- कैलास जाधव, दूध डेअरी व्यावसायिक.

‘वर्क फ्रॉम होम’ करता असताना वीज गेल्यामुळे काम करण्यासाठी अडचण निर्माण होते. बऱ्याचदा कारण नसताना वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. महावितरणने वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने नियोजन करावे.
- रवी शिंदे, आयटीयन्स

विजेवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फिडरचा प्रॉब्लेम असल्याचे सांगितले जाते. ‘लो-व्होल्टेज’मुळे दिवसभर लिफ्ट बंद पडतात. १२ मजले चढून जाताना दमछाक होते. जनरेटरवर विनाकारण खर्च वाढतो. पंखे बंद पडतात. वीज नसल्याने इंटरनेट बंद पडते.
- मोनिका जोशी, आयटीयन्स

‘‘ या भागात एका गुंठ्यात तब्बल आठ-दहा मजली इमारती बांधल्या जातात. प्रचंड ताण आल्याने फेज व ट्रान्सफॉर्मरवर लोड येऊन ते फेल होतात. ट्रान्सफॉर्मर बसवायलादेखील जागा नाही. पीएमआरडीएने यावर नियंत्रण देखील ठेवणे गरजेचे आहे.
- तोहीद पठाण, सहायक अभियंता, महावितरण, हिंजवडी विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com