मनविसे चषक २०२३ मध्ये
पन्ना क्लबला यश

मनविसे चषक २०२३ मध्ये पन्ना क्लबला यश

वाकड, ता. ११ : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित भव्य ‘६-ए’ फुटबॉल स्पर्धेचे पहिले पर्व मनविसे चषक २०२३ उत्साहात चिंचवड (सॉकर यार्ड) येथे झाले. यामध्ये जिल्ह्यातून २६ संघांनी सहभाग घेतला होता. विजयी संघाला मनविसेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमित ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम असे पारितोषिके प्रदान करण्यात आले.

विद्यार्थी सेनेच्या वतीने अमित ठाकरे यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. ठाकरे यांनी विजयी संघाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत अनुक्रमे पन्ना क्लब (२२ हजार २२२ रोख व ट्रॉफी), बीएचएफसी (११ हजार १११ रोख व ट्रॉफी) यांनी बक्षिसे पटकाविले. मनविसे सरचिटणीस, मनसे प्रवक्ते गजानन काळे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, मनविसे सचिव आशिष साबळे पाटील, शहर अध्यक्ष सचिन चिखले आदी पदाधिकारी उपस्थित होते. मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे व शहराध्यक्ष अनिकेत प्रभू यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.
उपशहराध्यक्ष ओंकार पाटोळे, विकास कदम, प्रतीक शिंदे, सिध्देश सोनकवडे, आकाश लांडगे, सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष सुमीत कलापुरे, मयूर हजारे, आकाश पांचाळ, विभाग सचिव शरण्य पाटणे, किरण पाटील, अक्षय खामकर, उपविभाग अध्यक्ष शंतनू तेलंग, ओंकार रेणुसे, सुशिल पोतदार, महेश बडगुजर, यश कुदळे यांनी नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com