राष्ट्रीय स्पर्धेत भारस्करने 
पटकाविले सुवर्णपदक

राष्ट्रीय स्पर्धेत भारस्करने पटकाविले सुवर्णपदक

हिंजवडी, ता. १३ : मारुंजी येथील पै. अमोल बुचडे कुस्ती अकादमीचा मल्ल सुमितकुमार लक्ष्मण भारस्कर याने १७ वर्षाखालील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ७१ किलो फ्रीस्टाईल वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे.
महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग यांनी कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथे राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सुमितकुमारने सुवर्णपदक पटकाविले. या सुवर्ण कामगिरीमुळे त्याची राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली होती. राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा मध्यप्रदेशात संपन्न झाल्या. यामध्ये महाराष्ट्राच्या १७ वर्षाखालील कुस्ती संघ सहभागी झाला. या संघामध्ये ७१ किलो फ्रीस्टाईल वजन गटात सुमितकुमारने राज्याचे नेतृत्व करत ७१ किलो वजन गटात महाराष्ट्रास सुवर्णपदक प्राप्त करून दिले. मागील तीन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके प्राप्त केली आहेत. सुमितच्या या यशाबद्दल पै. अमोल बुचडे, कोच नरेंद्र कुमार, पवन गोरे, महेश पाटील, अकादमीचे मार्गदर्शक प्रा. किसन बुचडे, कपिल बुचडे, विनोद गोरे, एपीआय मिलिंद झोडगे, प्रा. संतोष पवार, प्रा. महेश घुले यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com