कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचा 
दशकपूर्ती वर्धापनदिन साजरा

कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचा दशकपूर्ती वर्धापनदिन साजरा

वाकड, ता. ११ : कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचा दशकपूर्ती वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदस्यांनी गायन, नृत्य, भारुड, नाटक, मिमिक्री, कविता असे विविध कलागुण सादर करत टाळ्या अन् शिट्ट्यांनी वाहवा मिळविली. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणातून या ज्येष्ठांनी ‘अभी तो मैं जवान हूँ’ याचा जणू प्रत्यय देत धमाल उडवून दिली.
निवृत्त उपजिल्हाधिकारी विजयकुमार फड यांचे ‘जीवनाकडे पाहण्याची आनंदमय दृष्टी’ या विषयावर व्याख्यान झाले. खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी संयोजन करत या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले. डॉ. नारायण सुरवसे, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, रामदास कस्पटे, मोतीलाल ओसवाल, संतोष कस्पटे, आकाश शुक्ला, प्रसाद कस्पटे आदी उपस्थित होते.
नाटिकांमध्ये बाईपण भारी देवा, मेरे घर पे राम आये है, इलेक्शनवर नाटिका, चंद्रभागेच्या तीरावर आधारित भारूड आणि वंदे भारती हे कार्यक्रम लक्षवेधी ठरले. त्यात अनेक महिला वर्गाचा सहभाग होता. प्रामुख्याने यासाठी अरुणा लकडे, छाया निकुंब, उज्ज्वला डमकले, स्नेहलता कानडे, इंदिरा चौकडे व प्रमिला डेकाटे यांचा समावेश होता. अरुण देशमुख यांच्या नटसम्राटमधील स्वगतेंना रसिकांनी दाद दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संघाचे अध्यक्ष अरुण कस्पटे, उपाध्यक्ष मुकुंद डमकले, सचिव नरेश शास्री, सहसचिव भीमराव गाडे, कोषाध्यक्ष प्रभाकर कानडे, अरुण देशमुख यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com