परिपाठाला फुलणारे मैदान शोकसागरात बुडाले

परिपाठाला फुलणारे मैदान शोकसागरात बुडाले
Published on

वाकड, ता. ३० : माझा गुरु गेला, भाऊ गेला, माझा मित्र, माझा प्रिय सहकारी तर; कोणी माझा खंबीर पाठीराखा गेला म्हणून अश्रू ढाळत होता. लहानग्या विद्यार्थ्यांपासून ८० वर्षांच्या वृद्धाचाही तो व्यक्ती कोणीतरी खास होता हे मात्र नक्की ! परिपाठाला जमणारी-फुलणारी शाळेच्या मैदानावरील गर्दी मुख्याध्यापक नटराज जगताप यांच्या निधनामुळे शोकसागरात बुडाली.
गणेशनगर, थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुल आवारात जमलेल्या सुमारे पाच हजारांहून अधिक आजी-माजी विद्यार्थी, पालक, संघटना, समाजसेवी संस्थांतील तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींपैकी सर्वांनाच जगताप यांच्या जाण्याचे अतीव दुःख झाल्याची प्रचिती आली. शाळेवर अपार जीव असल्याने त्यांचे पार्थिव विद्यार्थी व पालकांना अंतिम दर्शनासाठी शाळेत आणण्यात आल्याने प्रार्थनेच्या मंजुळ सुरांऐवजी हजारो विद्यार्थी-पालकांचा रडण्याचा आवाज सगळ्यांच्या काळजाला भिडणारा होता.
जगताप यांनी शाळेला आयएसओ मानांकन मिळवून दिले. लायन्स क्लब, रोटरी क्लब, विविध समाजसेवक, उद्योजक तसेच लोकसहभागातून शाळेला अनेक भौतिक सुविधा उपलब्ध केल्या. त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प, सोलर पॅनेलद्वारे वीज बचत, शाळे भोवताली हिरव्या गर्द वृक्षांचे कुंपण, स्टेम सायन्स लॅब, अत्याधुनिक संगणक कक्ष, स्मार्ट टी.व्ही क्लास, टॅबचे वाटप, सभागृह बांधणी, प्रशस्त ग्रंथालय या सुविधांचा सहभाग होता.

नटराज जगताप सरांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था पदाधिकारी व समाज यांना एकत्र बांधून ठेवण्याची किमया साधलेली होती. सरांच्या स्वप्नातील शाळा घडविणे हेच आम्हा सर्वांचे ध्येय असेल. सरांना ती खरी श्रद्धांजली असेल.
- स्मिता जोशी, सहशिक्षिका, खिंवसरा पाटील शाळा, थेरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com