‘टिआरा’ वाकडमधील मुकूटमणी

‘टिआरा’ वाकडमधील मुकूटमणी

Published on

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. १६ : कै. तानाजीभाऊ कलाटे म्युझिकल उद्यान, सर्वात भव्य-सुंदर फिनिक्स मॉललगत व मुंबई - बंगळूर महामार्गासमोर अतिशय मोक्याच्या ठिकाणी हिरव्यागार वृक्षांच्या सान्निध्यात ‘टिआरा द काऊन ऑफ वाकड’ सोसायटी वसली आहे. ही सोसायटी म्हणजे आधुनिकता, संस्कृती, परंपरा, सौंदर्य, स्वच्छता आणि शिस्त यांचा अपूर्व संगम. तीन विंगमध्ये विभागलेली २१८ सदनिका ही सोसायटी खरंच जणू एक छोटेसे नंदनवनच. सुमारे हजार रहिवासी एकोपा, माया व आपुलकीने सुखी-समाधानी जीवनाचा आनंद घेत आहेत.
टिआरा सोसायटीत मुलांसाठी खेळण्याची जागा उपलब्ध आहे. व्यायामशाळा व सभागृह यासारख्या सुविधा येथे आहेत. मोठ्यांचा आदर, सत्कार, सन्मान देऊन सोसायटीचे सदस्य त्यांना प्रेम अन् आधार देत असतात. सर्वजण सण-उत्सव एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात. स्वच्छता कर्मचारीही उत्तम योगदान देत सोसायटी परिसर स्वच्छ ठेवत
असतात. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात.

सौर उर्जा, एसटीपी प्रकल्प
भव्य उद्यान, जिम, क्लब हाऊस, जलतरण तलाव, लहान मुलांसाठी प्ले एरिया, एसटीपी प्लांट याबरोबरच गरम पाणी आणि सामाईक जागेसाठी प्रकाश व्यवस्थेसाठी ६५ किलोवॅटचा सौर उर्जा प्रकल्प सोसायटीकडून साकारला जात आहे.

जलतरण, संगीताचे प्रशिक्षण
सर्व बाजूंनी सोसायटी हवेशीर आहे. एका बाजूला बंगलो प्लॉटस आहेत. दुसरीकडे कलाटे गार्डन आहे. समोर मोठा रस्ता आहे. सोसायटीत भरपूर मोकळी जागा असून मुले त्या जागेचा मनसोक्त खेळण्यासाठी वापर करतात. अभ्यासासह विविध ऍक्टिव्हिटीत मुले सक्रिय व्हावेत म्हणून जलतरण, नृत्य, गिटार वादन याचे प्रशिक्षण देण्यास प्रशिक्षक येतात.

सण-उत्सवाचा उत्साह
दरवर्षी गणेशोत्सवात लहान-मोठे मुले, ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी होतात. विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. नवरात्रीत दांडिया नाईट्स साजरी होते. मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, होळी, धुलीवंदन, वटपोर्णिमा, लोहारी, कोजागरी हे सण देखील साजरे केले जातात. श्रीराम प्रतिमा प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे सोसायटीला वाकड विभागातून द्वितीय क्रमांकाचा बहुमानही प्राप्त झाला. जो खऱ्या अर्थाने सर्वांसाठी अभिमानाचा सुवर्णक्षण ठरला.

सामाजिक योगदान
मोठा मॉल आणि उद्यान असल्याने शनिवार, रविवारी सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यावेळी आमचे रहिवासी आणि समितीचे सदस्य वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांसोबत स्वयंसेवक म्हणून काम करतात. कोरोना संकट काळात कामगार वसाहतीमध्ये धान्य वाटप करण्यात आले. गणेशोत्सवात देखील गोरगरिबांना व मजुरांना धान्य वाटप केला जाते.

लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांना योग्य तो मान-सन्मान सोसायटीत दिला जातो. सोसायटी एक कुटुंब आहे, एकोपा आणि आनंदाच्या गंधाचा दरवळ आमच्या सोसायटीत पसरलेला असतो. सौंदर्य, स्वच्छता, शिस्त यांचा मेळ इथेच सापडतो.
- डी. आर. कुलकर्णी, सदस्य, टिआरा सोसायटी


सोसायटीला चैतन्यशील समुदायात विकसित होताना पाहिले आहे. हिरवीगार जागा आणि सुस्थितीतील सोयी-सुविधांमुळे एक शांत वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांचा सक्रिय सहभाग एका मोठ्या कुटुंबासारखे बनवतो. स्थान, शांतता आणि सोयीचा परिपूर्ण समतोल साधते. टियाराला माझे घर म्हणताना मला अभिमान वाटतो.
- सुधीर गुप्ता, सदस्य, टिआरा सोसायटी


स्वच्छता, मोकळी जागा आणि उत्तम सुरक्षा व्यवस्थांमुळे सोसायटीमध्ये राहणे खूप आनंददायक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे
रहिवाशांमधील एकता आणि सहकार्याची भावना खऱ्या अर्थाने उत्तम राहण्यायोग्य ठिकाण बनवते.
- मनोज पाटील, सदस्य, टिआरा सोसायटी

सोसायटी म्हणजे कुटुंबांचे एक सुसंस्कृत वसतिस्थान आहे. मुलांचे उद्यान, जलतरण तलाव व जिम अशा उत्तम सुविधांमुळे सोसायटीत उत्साही वातावरणात फुलत आहे. प्रत्येक सदस्याचे सहकार्य व योगदान पारदर्शकतेने वापरून सोसायटीचा विकास आणि एकता जपली जाईल.
- सुनिल विश्नोई, खजिनदार, टिआरा सोसायटी

टिआरा सोसायटीमध्ये २१७ कुटुंबे एकत्र येऊन खऱ्या अर्थाने एक परिवार तयार झाला आहे. अध्यक्ष म्हणून सर्वजण मिळून सौहार्द, सुरक्षा आणि पुढील पिढ्यांसाठी हरित, आधुनिक सोसायटीचे उत्तम उदाहरण निर्माण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहतील.
- विवेक पाटील, अध्यक्ष, टिआरा सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com