मुंबई-बंगळुर महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला आग

मुंबई-बंगळुर महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला आग

Published on

वाकड, ता. ९ : मुंबई-बंगळुर महामार्गावर वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर मंगळवारी (ता. ९) सकाळी दहाच्या सुमारास चालत्या इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतला. दुचाकीस्वार महिलेने प्रसंगावधान दाखवत बाइक थांबवून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेनंतर महामार्गावर तब्बल तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या.
दुचाकीस्वार महिलेचे नाव अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी बावधन पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग विझवली. मात्र, तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली. महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड गोंधळ उडाला. हिंजवडी वाहतूक पोलिसांनी वाहनांना एका मार्गिकेवर वळविल्याने सुमारे तासाभरानंतर वाहतूक पूर्ववत झाली. संबंधित दुचाकीस्वार महिला साताऱ्याच्या दिशेने जात असताना तिच्या वाहनामधून अचानक धूर निघू लागला. काही कळते ना कळते; तोच मागील बाजूने पेट घेतला. हा प्रकार दुचाकीस्वार महिलेच्या लक्षात आला. तसेच जवळून जाणाऱ्या वाहनचालकांनी देखील त्यांना सूचित केल्याने त्या बाजूला झाल्या आणि काही क्षणांतच दुचाकीला भीषण आग लागली. बॅटरी ओव्हरहीटिंगमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या काही महिन्यांत देशभरात इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटरला आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, बॅटरीतील शॉर्ट सर्किट, जास्त तापमान, किंवा सदोष उत्पादन ही आगीची प्रमुख कारणे असू शकतात.
WKD25A09477

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com