पिंपरी-चिंचवड
अलार्ड हायस्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात
हिंजवडी, ता. १५ : मारुंजी येथील अलार्ड हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिन उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता, नृत्य, भाषण व नाटक सादर केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. आर. यादव यांनी हिंदी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या, सचिव डॉ. आर. एस. यादव यांनी सर्व भाषांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक इंद्रजित जाधव यांनी हिंदी विषय शिक्षकांचा सन्मान केला. उपमुख्याध्यापक रवींद्र माळी यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापिका आरती पाटील, पर्यवेक्षिका प्राजक्ता रोटे, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख दीपमाला अनामी तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख यशश्री कारंडे यांनी नियोजन केले. विद्यार्थिनी डिंपल बुचडे व दीपाली महाले यांनी आभार मानले.