‘दादा, अण्णा, भाऊ...सांगा आमची चूक काय?’
वाकड, ता. १ : ‘‘सहा महिन्यांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार-खासदारांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यामुळे मागील दहा वर्षे संत तुकाराम कारखान्याच्या जडणघडणीत तन, मन, धनाने योगदान देऊनही डावलले,’’ असा दावा करत माजी संचालकांनी ‘‘दादा, भाऊ, अण्णा, शेठ सांगा आमची चूक काय?’’ अशा आशयाचे पत्रक कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत उस उत्पादक शेतकऱ्यांना वाटप केले. या निनावी पत्रामुळे माजी संचालकांची नाराजी हा सर्वसाधारण सभेत चर्चेचा विषय ठरला.
वाकड येथे सोमवारी (ता. २९) झालेल्या या सभेला या नाराज माजी संचालकांनी पत्रके घेऊन हजेरी लावली. ‘आमची चूक काय?’ या शब्दांत त्यांनी सहवीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्प उभारणीतील बचत, शेतकरी व कामगार कल्याण आणि कोरोना काळात तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या कार्याचा उल्लेख करत नाराजांनी आपल्या भूमिका पत्रकाद्वारे शेतकऱ्यांसमोर मांडल्या. अंदाजपत्रकानुसार ९४ कोटी रुपयांच्या निधीतून उभारायचा हा प्रकल्प त्यांनी केवळ ७३ कोटी रुपयांत पूर्ण करून २१ कोटींची बचत साधली. हा प्रकल्प अवघ्या ११ महिन्यांत उभा राहिला. प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यासाठी जरांडेश्वर, दौंड शुगर, द्वारकाधीश, भीमाशंकर आणि श्री. श्री. शुगरसारख्या कारखान्यांना स्वखर्चाने भेटी देण्याचा उल्लेख करत, त्यांनी आपल्याकडून केलेल्या त्याग व समर्पणाची आठवण करून दिली आहे.
‘‘स्वत:च्या गाडीत डिझेल भरून फिरलो, ही आमची चूक?’’, असा भावनिक सवालही पत्रातून उपस्थित केला आहे. शेतकरी व कामगारांच्या हितासाठी केलेल्या कामगिरीचीही त्यांनी आठवण करून देत एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट, कामगारांचे वेतन आणि दिवाळी बोनस नियमित अदा केले, असेही सांगितले आहे.
...ही आमची चूक होती का?
‘‘कोरोना काळात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गावोगावी फिरून ऊस तोडणी कामगारांना धीर देणे, त्यांची आहार आणि आरोग्याची व्यवस्था करणे इत्यादी कामे केली. मुख्य प्रवेशद्वारवरील कमान ३५ लाख रुपयांच्या अंदाजापेक्षा २५ लाखांत पूर्ण केली, तर कारखान्याच्या सीमाभिंतीसाठी एक कोटी ३० लाखांच्या बजेटऐवजी ९६ लाखांत काम पूर्ण केले,’’ असे दावे या पदाधिकाऱ्यांनी केले. सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी स्वतःच्या नावावर कर्ज काढून स्वतःचे पैसे कारखाना व शेतकरी हितासाठी गुंतवले, ही आमची चूक होती का?, असेही त्यांनी राज्यकर्त्यांना केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.