हिंजवडी ग्रामपंचायतीचा महाभोंडला उत्साहात

हिंजवडी ग्रामपंचायतीचा महाभोंडला उत्साहात

Published on

हिंजवडी, ता. १ : हिंजवडी ग्रामपंचायतीच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये शेकडो महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच गणेश जांभुळकर, उपसरपंच दीपाली जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन जांभुळकर, मच्छिंद्र हुलावळे, मनिषा हुलावळे, प्रतीक्षा जांभुळकर, ऐश्वर्या वाघमारे, पल्लवी गंगावणे तसेच ग्रामविकास अधिकारी सोमा खैरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. महिलांनी फेर धरत दांडिया आणि गरबा खेळाचा मनमुराद आनंद घेतला.
या महाभोंडला सोहळ्यात विविध खेळांत भाग्यवान ठरलेल्या पाच महिलांना अनुक्रमे प्रथम : आरती संदीप साखरे (सोन्याची नथ), द्वितीय : राजश्री राजेंद्र देशमुख (पैठणी), तृतीय : शोभा तानाजी साखरे (मिक्सर), चतुर्थ : सीमा गायकवाड (वॉटर फिल्टर), पाचवा : श्रीमती रणभोर (गॅस शेगडी) अशी बक्षिसे देण्यात आली. तसेच प्रत्येक सहभागी महिलेस भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सरपंच गणेश जांभुळकर यांच्या संकल्पनेतून अतिशय शिस्तबद्ध आणि जल्लोषात महाभोंडला पार पडला.
WKD25A09582

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com