मद्यधुंद बसचालकामुळे आणखी एक अपघात
वाकड, ता. ४ : खासगी बसच्या मद्यधुंद चालकाने विरुद्ध दिशेने येत मोटार आणि रिक्षाला धडक दिली. यात कारचालक जखमी झाला. तर, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता.४) मध्यरात्री हा अपघात वाकड पुलावर झाला.
या प्रकरणी अजय हंसराज जाधव (वय २४, रा. भोईरवाडी, माण फेज ३) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक संतोष अशोक काळे (वय ३६, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘अजय जाधव हे कारमधून (एमएच १४-एलबी ७३१०) वाकड चौकातून हिंजवडीकडे जात होते. दरम्यान, समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या खासगी बसने (एमएच ०५-डीके ६३७७) त्यांच्या कार आणि रिक्षाला (एमएच १४-एचएम ७८८८) धडक दिली. यात जाधव यांना जबर दुखापत झाली. यावेळी बसचालक मद्यधुंद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.’’ अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र मारणे करत आहेत.
अपघातांचे सत्र कायम
आरएमसी मिक्सर आणि अन्य बांधकाम साहित्य वाहणाऱ्या अवजड वाहनांपाठोपाठ खासगी बस चालकांचाही मुजोरपणा समोर येत आहे. हिंजवडीत मद्यधुंद बसचालकाने तिघा भावंडांचा जीव घेतल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत; तोच याच भागात पुन्हा एका अपघाताची नोंद झाली आहे. त्यामुळे हे सत्र कधी थांबणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.
PNE25V73699
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

