सायकलस्वाराला धडक देऊन कारचालक पसार

सायकलस्वाराला धडक देऊन कारचालक पसार

Published on

हिंजवडी, ता. ५ : कारच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला. तर, अपघातानंतर जखमीला सोडून कारचालक पसार झाला. ही घटना मंगळवारी (ता. २) दुपारी डांगे चौक पुलाजवळ घडली. या प्रकरणी संतोष कृष्ण हरम (वय ६०, रा. रोहन निलय, औंध) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष हे प्राध्यापक असून ते शारीरिक कसरतीसाठी या रस्त्यावर नेहमी सायकलिंग करतात. मंगळवारी दुपारी ते औंधकडे जात होते. दरम्यान, मागून आलेल्या काळ्या टाटा हॅरियर कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात संतोष गंभीर जखमी झाले असून सायकलचेही नुकसान झाले. हिंजवडी पोलिस या कारचालकाचा शोध घेत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com