गगनगिरी महाराज आश्रमात फुलला भक्तीचा मळा
वाकड, ता. ७ : पुनावळे येथील स्वामी गगनगिरी महाराज आश्रमातील मूर्ती स्थापनेचा १३ वा वर्धापन दिन सोहळा तसेच संत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या ३७६ व्या वैकुंठ गमन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम भक्ती, श्रद्धा व आध्यात्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. आश्रम परिसर ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामघोषाने दुमदुमून गेला.
भगवंताचे सगुण साजिरे रूप पाहताना अंतःकरण सुखी व समाधानी होते. सदविचार व संतसंगतीतूनच भगवंताची कृपा प्राप्त होते, या भावनेतून भाविकांनी तन,मन-धनाने सहकार्य करत मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग नोंदविला. ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भक्तीची उंची लाभली.
याप्रसंगी सुप्रसिद्ध कीर्तनकार महादेव महाराज राऊत (बीड) यांनी सादर केलेल्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा जागर, अभंगांची अनुभूती आणि भक्तिरसाने वातावरण भारावून गेले.
आमदार शंकर जगताप, नगरसेवक राहुल कलाटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, नगरसेविका रेश्मा भुजबळ, श्रुती वाकडकर, मोरेश्वर भोंडवे, राम वाकडकर, हेमंत कोयते, तानाजी शिंदे, विलास बोरगे, लक्ष्मण मोहिते, प्रशांत भुजबळ यांच्यासह माजी व विद्यमान नगरसेवक-नगरसेविका, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्यावतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल अध्यक्ष निवृत्ती भुजबळ व उपाध्यक्ष संजय महाराज दर्शले यांच्यासह समस्त ग्रामस्थांचे उपस्थित भाविकांनी मनापासून कौतुक केले. महाप्रसादाने सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

