प्रज्ञा विद्यामंदिर शाळेच्या 
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

प्रज्ञा विद्यामंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Published on

वाकड, ता. १२ : थेरगावमधील गणेश नगर परिसरातील प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रज्ञा विद्यामंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला. काही माजी शिक्षकांच्या आठवणी, कृतज्ञता आणि प्रेरणेमुळे मेळावा संस्मरणीय ठरला. अनेक वर्षांनंतर शाळेच्या आवारात पाऊल टाकताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञतेचे भाव होते. शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच आयुष्याला दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कुणी शासकीय सेवेत, कुणी उद्योजक, तर कुणी सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षणातील शिक्षकांचा अनुभव महाविद्यालयापर्यंत मिळाला नसल्याचेही काही विद्यार्थ्यांनी नमूद केले. त्यांची प्रगती ऐकून शिक्षक भारावून गेले.
शाळेतील गमती-जमती, कडक शिस्तीमागील प्रेमळ शिक्षक यांचा आठवणींतून उल्लेख झाला. यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा घेऊन शाळेला शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन मुख्याध्यापिका प्रज्ञा गवळी यांना देण्यात आले. माजी शिक्षिका पंचशीला लांडगे व रेणुका गवळी, सचिव भारती गवळी आणि अध्यक्ष गोरख गवळी, प्रज्ञा गवळी यांनी माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थी सूरज वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.
WKD26A10457

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com