वाकड फाटा येथील अतिक्रमणांवर धडक कारवाई
वाकड, ता. १२ : वाकड फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांवर अखेर महापालिकेने धडक कारवाई केली. ‘सकाळ’ने या समस्येवर वारंवार प्रकाश टाकत वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघाताचा वाढता धोका याकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी (ता. ११) दुपारी ही मोहीम राबवली.
महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. हातगाड्या, फळभाज्यांचे स्टॉल, अनधिकृत फलक व काही साहित्य हटवून ते जप्त करण्यात आले असून संबंधितांना दंडही आकारण्यात आला आहे. वाकड फाटा हा अत्यंत वर्दळीचा चौक असून येथे फेरीवाले, हातगाड्या, अनधिकृत स्टॉल तसेच चक्क पदपथ गिळंकृत करून व्यवसाय सुरू करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली होती आणि सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होत होती.
अचानक झालेल्या कारवाईमुळे सर्वांचीच मोठी पळापळ झाली. दरम्यान, ‘‘अशी कारवाई नियमित व्हावी, अन्यथा पुन्हा अतिक्रमण वाढते’’ असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या भागात रस्ते अडवून, पदपथांवर अतिक्रमण करून सुरू असलेल्या व्यवसायांमुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत होते. भविष्यातही वाकड फाटा परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नियमित पाहणी केली जाईल. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- किशोर ननावरे, ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी, थेरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

