

वाकड, ता. २० : येथील इंदिरा विद्यापीठात माजी विद्यार्थिनी त्विशा शर्माच्या स्मरणार्थ आयोजित प्रार्थना सभेत ‘इंदिरा स्त्री’ या विशेष सहाय्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्विशाच्या हुंडाबळीमुळे झालेल्या दुदैवी निधनानंतर महिलांची सुरक्षा आणि मानसिक आधारासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या सभेला विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. त्विशाचे आई-वडील ऑनलाईन सहभागी झाले. सभागृहात काही क्षण शांतता पाळून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. इंदिरा विद्यापीठाच्या अध्यक्षा तथा प्रमुख मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘इंदिरा स्त्री’ उपक्रमाद्वारे विद्यापीठाशी संबंधित सर्व महिलांना भावनिक आधार, मानसिक आरोग्य समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, मेंटरशिप, कायदेशीर मदतीसाठी मार्गदर्शन आणि आपत्कालीन सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही महिलांना संस्थेचा आधार कायम राहील, असा संदेश यावेळी देण्यात आला.
त्विशासोबत जे घडले, ते कोणत्याही मुलीसोबत घडू नये. समाजात अजूनही हुंड्यासाठी महिलांवर अन्याय होत असून अनेक घटना दडपल्या जातात. महिलांनी अडचणीत एकटे वाटून घेऊ नये, यासाठी विद्यापीठाने ठोस पाऊल उचलले आहे.
- डॉ. तरिता शंकर, अध्यक्षा तथा प्रमुख मार्गदर्शिका इंदिरा विद्यापीठ
WKD26A11035
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.