पिंपरी-चिंचवडपरिसरात मुसळधार पाऊस; पवना नदीच्या पातळीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडपरिसरात मुसळधार पाऊस

पिंपरी-चिंचवडपरिसरात मुसळधार पाऊस; पवना नदीच्या पातळीत वाढ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री विश्रांती घेतल्यानंतर सकाळी पुन्हा मुसळधार झाल्याने पवना नदी पात्रातील खालावलेली पाण्याची पातळी पुन्हा काहीशी वाढली. मात्र, सध्या परिस्थिती आटोक्यात असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

शहरात गुरुवारी (ता. २२) दिवसभर पाऊस झाला. यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली. त्यानंतर रात्री काहीशी उघडीप घेतल्याने शुक्रवारी (ता. २३) सकाळी पाणी पातळी पाच फुटाने खालावली. मात्र, सकाळपासून पुन्हा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. यामुळे पाणी पातळी हळूहळू वाढत आहे. मात्र, मावळातील पवना धरणातून विसर्ग केला नसल्याने अद्यपपर्यंत तरी पाणीपातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली नसल्याने भीती नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

पवना नदी

पवना नदी

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सुरु झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून जाताना जवळील अंतरावरीलही दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकानी रस्त्यालगत वाहन उभे केले. ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

पवना नदी

पवना नदी

आकुर्डीतील काळभोरनगर, वल्लभनगर येथील भुयारी मार्गांसह कासारवाडीतील शंकरवाडी येथील भुयारी मार्गात मोठाप्रमाणात पाणी साचले आहे. चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातही शिरले आहे. पाण्याने संपुर्ण समाधी मंदिराला वेढा घातला आहे. दुपारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला.

पवना नदी

पवना नदी

क्षेत्रीय स्तरावर पथक

पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासह तातडीने मदत पोचविण्यासाठी महापालीकेने क्षेत्रीय स्तरावर पथक स्थापन केले आहे. या पथकाची ठिकठिकाणी गस्त सुरु आहे. नदीकाठचा परिसराची पाहणी करून तेथील रहिवाशांना सूचना दिल्या जात आहेत.

अग्निशामक यंत्रणा सज्ज

अग्निशामक विभागाचे पिंपरीतील मुख्य केंद्रासह उप केंद्रावरील यंत्रणा सज्ज आहे. तातडीच्या मदतीसह, बचावकार्य यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.