पिंपरीतील आनंदनगरसाठी मोठी धक्कादायक बातमी; आज कोरोनाचे...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

  • पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण रुग्ण ३११
  • गेल्या 24 तासांत आढळले 46 रुग्ण. आनंदनगरचे 19 
  • आज एक डॉक्टर, एक नर्स व एका पोलिसाला संसर्ग 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या शनिवारी (ता. 23) सायंकाळी सातपर्यंत 311 झाली. यात शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी सातपासून शनिवारी सायंकाळी सातपर्यंत 46 रुग्णांची भर पडली. या 311 जणांवर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर, शहरातील रहिवासी मात्र पुण्यातील रुग्णालयांत 20 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेली रुग्ण संख्या 331 झाली आहे. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही 169 पर्यंत पोचली आहे. आज आठ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज एक डॉक्टर, एक नर्स व एका पोलिसाला संसर्ग झालेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात संसर्ग सुरू होऊन 70 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांत अनेक घटना घडल्या आहेत. सुरुवातीला सोसायटीत आढळलेला कोरोना आता मध्यमवर्गीय वस्तीतून झोपडपट्टीत शिरला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे वायसीएम व भोसरी रुग्णालय सज्ज आहे.‌ शिवाय मोबाईल लॅबद्वारे वस्ती पातळीवर कोरोनापूर्व चाचणी मोफत केली जात आहे.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत 135 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत बाधा झालेल्यांमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. पण, ज्या प्रमाणात रुग्ण वाढताहेत, त्या प्रमाणात कमी सुद्धा होताहेत. सध्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, सेवक, पोलिस, महापालिका अधिकारी कर्मचारी लढत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आजपर्यंतची स्धिती

आजपर्यंत शहरातील बाधित रुग्णांची संख्या ३११ झाली आहे. गेल्या 24 तासांत पिंपरी चिंचवड हद्दीत तब्बल 46 बाधित रुग्ण आढळले. तर, पुण्यातील चार जणांना ही संसर्ग झाला आहे. आजपर्यंत पुर्णपणे बरे झालेले शहरातील रूग्ण १६९ आहेत.

आज आढळलेले रुग्ण

आज बाधित आढळलेले रुग्ण हे आनंदनगर-चिंचवड, पिंपरी, वाकड , भोसरी, वडमुखवाडी आणि पुण्यातील भवानी पेठ, नानापेठ , येरवडा, खडकी येथील रहिवासी आहेत.

आज कोरोना मुक्त 

इंदिरानगर चिंचवड, आकुर्डी, चऱ्होली व थेरगाव येथील रहिवासी असलेले नऊ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आज सील केलेला भाग              

पिंपरी कॅम्प, वाकड पोलिस लाईन, अलंकापुरम सोसायटी- वडमुखवाडी,   हा सर्व परिसर कंटेनमेंट झोन घोषीत करून सील केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total 64 corona positive in Anandnagar Pimpri Chinchwad