Heavy traffic jam on Talegaon Chakan Highway with long queues of vehicles
sakal
तळेगाव स्टेशन - चाकण एमआयडीसीतीलअंतर्गत सिमेंट रस्त्याचा भराव पावसामुळे वाहुन गेल्याने तळेगाव-चाकण मार्गावर औद्योगिक क्षेत्रातील रहदारीचा ताण वाढला. तसेच देहू-आळंदी पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून वाढलेलया वारकऱ्यांच्या वाहनांच्या ओघामुळे तळेगाव-चाकण महामार्गावर बुधवार (ता. ०८) प्रचंड वाहतूक कोंडीचा ठरला. २२ किलोमीटरच्या टप्प्यात तब्बल ७ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळाली.