Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद
Police Attack : मोशीतील भारतमाता चौकात सिग्नल तोडलेल्या मोटारीचे छायाचित्र काढल्याच्या रागातून मोटार चालकाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी मनोज चौधरी आणि सखाराम मोरे या दोघांना अटक केली.
पिंपरी : सिग्नल तोडलेल्या मोटारीचे छायाचित्र टिपल्याने चालकाकडून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली. मोशीतील भारतमाता चौकात हा प्रकार घडला.